श्री संत सदगुरू गोदड महाराज संस्थांकडून दिव्य धर्मयज्ञ सोहळा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथे श्री संत सदगुरू गोदड महाराज संस्थान, केडगावचे श्रीमंत सदगुरु शंकर शेठ महाराज मठ, श्री सदगुरू कचरनाथ सेवा मंडळ आणि श्री गुरुदेव दत्त परिवार यांच्या सहकार्याने पुरुषोत्तम मास निमित्ताने दोन दिवसीय दिव्य धर्म यज्ञ सोहळा आयोजित केला असून यामध्ये काल भव्य ३०१ कुंडात्मक महादत्त याद व महाविष्णू याग सम्पन्न झाला. दिनांक ७ ऑगस्ट रोजी श्री गोदड महाराज मंदिरामध्ये गणेश याग, १०८ सत्यनारायण महापूजा व विष्णुसहस्रनाम पाठ करण्यात आले तर आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी श्रींना अभिषेक आठ ते नऊ दरम्यान कलश स्थापना, पीठ स्थापना, पुण्यह वाचन, गणेश मातृका, नवग्रह पूजन करून दुपारी विष्णू याग, दत्तयाग, पूर्णाहुती महा आरती, महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अशोक दादा जाधव केडगाव यांनी दिली आहे, या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कर्जत मधील अनेक भाविक मनोभावे सेवा करत आहेत.
आज आयोजित यज्ञ यागासाठी तालुक्यातील चारशे कुटुंबातील पती पत्नी अथवा इतर लोक यात सहभागी झले असून बाजारतळ याठिकाणी आयोजित या उपक्रमात भव्य सजावट करण्यात आली आहे. मध्यवर्ती श्री दत्त महाराजांच्या मूर्ती सह विविध देवदेवताची प्रतिष्ठापन करण्यात आली असून त्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या आहेत. तर भव्य मंडपात केळीच्या खुंट उभारण्यात आले आहेत. कर्जत मध्ये प्रथमच होत असलेल्या या भव्य आयोजनात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.