नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक प्रसाद ढोकळीकर यांचा शिक्षक बँकेच्या संचालकांकडून सत्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक शाखा कर्जत येथे कर्जत नगरपंचायतीचे स्विकृत नगरसेवक, धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव डाकूचे संस्थापक अध्यक्ष, विश्वकर्मा पतसंस्थेचे चेअरमन प्रसाद ढोकरीकर, स्विकृत नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक सुनिल शेलार, नगरसेवक लालासाहेब शेळके, पाणीपुरवठा व आदर्श पत्रकार भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक देविदास खरात, नगरसेवक भास्कर भैलूमे, दादासाहेब चव्हाण, या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक बँकेचे मा. चेअरमन शरदभाऊ सुद्रिक, राज्य प्रतिनिधी अनिल टकले, जिल्हा प्रतिनिधी आबासाहेब सूर्यवंशी, व राजेंद्र सकट, ऐक्य मंडळाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय परहर, जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब तापकीर, अहमदनगर विकास मंडळाचे विश्वस्त नवनाथ दिवटे सर, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष, बजरंग गोडसे, सरचिटणीस . ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी अशोक घालमे, शिक्षक बँकेचे मॅनेजर श्री बाळासाहेब गांगर्डे,तंत्रस्नेही शिक्षक .संतोष अनभुले , तंत्रस्नेही शिक्षक कदम सर, तंत्रस्नेही शरद पवार,.संतोष खांदवे सर बँक कर्मचारी श्री.विकास साळवे, हे सर्वजण उपस्थित होते.
प्रास्ताविक तापकीर यांनी केले. सुत्रसंचालन गोडसे यांनी केले.
यावेळी आबासाहेब सूर्यवंशी, नवनाथ दिवटे, ज्ञानेश्वर गायकवाड, शरदभाऊ सुद्रिक, या सर्वांनी शिक्षक बँक, विकास मंडळ , शिक्षकांचे प्रश्न व अशैक्षणिक कामे , कंत्राटीकरण, त्रैवार्षिक अधिवेशन या विषयी आपल्या भाषणातून आपली मनोगते व्यक्त केली. नगरसेवक सुनिल शेलार व नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षक बँकेच्या ठेवी वाढविण्यासाठी व शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच विश्वकर्मा पतसंस्थेच्या माध्यमातून दरवर्षी कर्जत तालुक्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान करणार असल्याचे मत. प्रसाद ढोकरीकर यांनी व्यक्त केले.
आभार जिल्हा प्रतिनिधी अशोक घालमे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.