कर्जत तालुक्याचा बहुमान रणजीत नलवडे आणि अतुल राजेजाधव यांना महाराष्ट्र बिजनेस आयकॉन पुरस्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील तरुण व यशस्वी उद्योजक अशी ओळख असलेले रणजीत नलवडे व अतुल राजेजाधव यांना राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा असलेला महाराष्ट्र बिजनेस आयकॉन सन 2023 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राज्यातील प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कार्यक्रम स्थळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्या वाजवून या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
कर्जत तालुक्यात उद्योग व व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपली कमी कालावधीमध्ये एक चांगली व यशस्वी उद्योजक अशी ओळख निर्माण करणारे दोन युवा उद्योजक म्हणून रणजीत नलवडे व अतुल राजे जाधव यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील मिळालेल्या यशाची दखल घेत त्यांना राज्यातील अतिशय प्रतिष्ठित असा ओळखला जाणार महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवार्ड हा पुरस्कार नाशिक येथे देण्यात आला. या पुरस्कारासाठी राज्यभरातून काही यशस्वी
युवा उद्योजकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये रणजित नलवडे व अतुल राजेजाधव यांचा समावेश आहे. हा पुरस्कार त्यांना मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारी यशस्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तेजस्विनी पंडित यांनी देखील रणजीत नलवडे व अतुलराजे जाधव यांची विशेष अभिनंदन केले.
पुरस्कार कार्यक्रम सुरू असताना जेव्हा या पुरस्कारासाठ राज्यातून रणजीत नलवडे व अतुल राजे जाधव यांची ना घोषणा जाहीर करतात उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने यांचे स्वागत केले.
नाशिक येथील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील सर्व यशस्वीउद्योजक सहभागी झाले होते. यामध्ये विविध नामांकित कंपन्यांची प्रमुख यांचा सहभाग होता. या युवा उद्योजकांची निवड होताच सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. रणजीत नलवडे व अतुलराजे जाधव यांनी कर्जत तालुक्याच्या इतिहासामध्ये क मानाचा तुरा हा पुरस्कार मिळवून रोवला आहे. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल,राहुल नवले (संभाजी ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष अहमदनगर )
अभिजित नलवडे (नलवडे कॉन्ट्रक्शन कर्जत ) यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.