कुळधरण येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात दोन गटा मध्ये जबर मारहाण

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात लेझिम खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी पाईप, लोखंडी गज व लाकडी दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण झाली. २५ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी १० जणांविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये ऋषिकेश दिलीप सुपेकर व भाऊसाहेब विठ्ठल गुंड, दोघे रा. कुळधरण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये मयूर गोरख सुपेकर, अक्षय बापू सुपेकर, अक्षय दिलीप सुपेकर, हनुमंत दत्तात्रय सुपेकर, अक्षय आनंता जगताप, शरद दत्तात्रय सुपेकर व इतर ३ ते ४ जणांचा समावेश आहे.
त्यांच्याविरुद्ध कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे यांनी तपास सुरू असल्याचे सांगून आरोपींना अटक केली नसल्याचे सांगितले. अधिक तपास करत आहेत. मारहाणीचा प्रकार होताच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तात्काळ कुळधरण येथे भेट दिली.