शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच राशीनच्या मुख्य बाजारपेठेत टँकरद्वारे धुळयुक्त रस्त्यावर पाण्याची फवारणी तात्काळ सुरू.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- श्री जगदंबा देवी नवरात्री उत्सव दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात.
यात्रा दरम्यान दौंड -धाराशिव रस्त्यावर व इतर ठिकाणी धुळीचे साम्राज्य दिसून येत होते. यावेळी शिंदे सेनेकडून मुख्य रस्त्यावर टँकरद्वारे दोन ते तीन वेळा पाणी फवारण्याची मागणी केली असता,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दक्षता घेत राशिन च्या मुख्य तसेच इतर रस्त्यावर टँकरद्वारे पाणी फवारणी सुरू केल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचा इतर नागरिकांचा धुळीमुळे कोंडता श्वास मोकळा झाला असून,
धुळीमुळे होणाऱ्या दीर्घ आजारांना विराम लागला आहे.धुळीचे प्रमाण कमी झाल्यामुळे राशीन व पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडून व इतर ग्रामस्थांकडून शिंदे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके, राशिन शहराध्यक्ष दीपक जंजिरे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.कमल रमेश मासाळ, युवा सेना शहर प्रमुख योगेश भवर, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, सौरभ काळे, विकास काळे, व इतर पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.