राशीन च्या उषा हिरभगत यांचे अपघाती निधन

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील उषा प्रकाश हिरभगत (वय : ६५) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बॅकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी प्रकाश संभाजी हिरभगत यांच्या त्या पत्नी होत.
२० सप्टेंबर रोजी राशीन येथील महात्मा फुले चौकात त्यांना अपघात झाला होता. भिगवणच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने रस्त्यावर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. बापू संभाजी मोढळे, रा. मोढळे वस्ती, राशीन हे चालवत असलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हिरभगत यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली होती.त्यांच्यावर बारामती येथील खासगी
रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या मेंदूचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र अखेर उपचारादर त्यांची प्राणज्योत मालवली.