राशीन येथील युवा व्यावसायिक ईश्वर माने यांच्या वाढदिवसानिमित्त कामधेनु गोशाळेतील गाई’ना चारा वाटत.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- अत्यंत गरीब बिकट परिस्थितीतून मात करीत उत्कृष्ट चिकन व्यवसायाला खडतर प्रयत्न करीत चालना देत चिकन व्यवसाय नाव रूपाला आणणारे राशीन येथील युवा व्यवसायिक ईश्वर माने यांच्या वाढदिवसानिमित्त कामधेनु गोशाळा राशिन येथील प्रकल्पातील कत्तलीपासून जीव वाचून संगोपन करत असलेल्या गाईंसाठी एक टन चारा वाटप करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब माने, नीलू काळे, हे उपस्थित होते. ईश्वर माने हे गेल्या अनेक वर्षापासून आपली सामाजिक बांधिलकी जपत जनजागृती प्रतिष्ठानच्या सर्व प्रकल्पांना आपल्या वाढदिवसानिमित्त सतत वेळोवेळी मदत करत असतात याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी ईश्वर माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत यांचे आभार मानले.
तसेच दिवसेंनदिवस गोशाळेमध्ये गाईची संख्या वाढत असल्यामुळे तसेच यावर्षी निसर्ग राजाच्या कॊपल्यामुळे पावसाची परिस्थिती सध्या बिकट असल्यामुळे चारा टंचाई जाणवत असल्यामुळे, खूप मोठ्या संकटास सामोरे जावे लागत आहे, तरी राशीन व परिसरातील दानशूर, शेतकरी मित्र, गो प्रेमी यांना विनंती करण्यात येते की आपल्या वतीने गोशाळेतील गाईंसाठी चारा उपलब्ध करून देण्याची विनंती जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात येत आहे. तसेच इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्याच्या वाटेवर खर्च करावा हीच इच्छा.