दादा पाटील महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे आज २६ जून २०२३ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी. एन. देवकाते यांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल विचार मांडले. राजर्षी शाहू जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून हा दिवस साजरा होत आहे. शिक्षण, शेती, सहकार, उद्योग, जातिभेद निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, कला, क्रीडा या क्षेत्रात शाहू महाराजांनी अद्वितीय कार्य केले आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनंतर शाहू महाराजांनी लोकाभिमुख राज्यकारभार केल्याचे नमूद केले.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानत. त्यांचा सत्यशोधक वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. शिक्षणाशिवाय येथील बहुजन समाजाचा विकास होणार नाही हे जाणून त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणगंगा उपेक्षितांच्या दारात नेली. राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक मानले जाते. वेदोक्त प्रकरणात त्यांनी कर्मटांना चांगले सुनावले. लोककल्याणकारी, मानवतावादी, कलाप्रेमी, कार्यसम्राट अशा बिरुदावल्या शाहू महाराजांना वापरल्या जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
जयंती उपक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले