राशीन मध्ये एटीएम मशीन ची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

राशीन(प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथील युनियन बँक ऑफ इंडिया च्या शाखे शेजारील असलेल्या एटीएम मशीन हत्यार बंद अवस्थेत आलेल्या चोरट्यांनी उचकटून चोरी करून नेले चार लाख ६७ सातशे रुपयाची धाडसी चोरी केली. ही घटना मंगळवार दिनांक.३.१०.२३. रोजी पावणे चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे तातडीने हलवल्यामुळे चार चोरांच्या मुसक्या तासातच आवळण्यात पोलिसांना यश आले. राशिन-भिगवन रस्त्याच्या कडेला हिताची कंपनीचे एटीएम आहे. पहाटेच्या चारच्या सुमारास कोयता कुऱ्हाड व इतर धारदार हत्यारे व पिकॶप गाडी घेऊन आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले ते मशीन पिकॶप मध्ये टाकून पलायन केले. या सदर घटनेची माहिती मिळतात कर्जतचे पोलीस उपॶधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक अमरजीत सालगुडे, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. त्यानंतर करमाळा माढा तालुक्यातील पोलिसांना या घटनेची माहिती देऊन नाकाबंदी करण्यास सांगितले. एटीएम व त्यातील तीन लाख रुपये आणि आरोपी माढा तालुक्यात लोंडेवाडी वाकाव ते पकडण्यात आले.
पोलिसांनी पाठलाग करीत चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या महादेव नागेश सलगर, अविनाश मारुती कारंडे, सतीश शहाजी खांडेकर, बाळासाहेब हरिचंद्र चौगुले हे चौघे राहणार गुंडेगाव तालुका बार्शी यांना अटक करण्यात आली. एटीएम मशीनचे चालक दत्तात्रय मारुती पवार राहणार कर्जत यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.