दादा पाटील महाविद्यालयात ‘कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शन’ सुरु

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालायात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ दि. २१ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होतो आहे.
सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये सकाळी ९ वाजता ‘ कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शन’चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय कांबळे, इस्लामपूरच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीचेे संचालक प्रा. अजित पाटील, प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे उपस्थित होते.
कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शनाचे संयोजन डॉ. संतोष लगड, प्रा. सुनील देशमुख, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. आसिफ सय्यद यांनी केले.
‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जयंती दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ यांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी व समन्वयकांनी केलेले आहे