
कर्जत प्रतिनिधी :- देशातील सर्वात प्रतिष्ठीत अभियांत्रीकी प्रवेश प्रक्रिया जेईई अडव्हान्स चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये श्री अमरनाथ विद्यालयाची विद्यार्थी कु . महेश्वरी भालचंद्र खंडागळे . रा . शिंदे ही IIT वाराणसी साठी प्राप्त झाली असून तिची OBC रँक 7734 आली . आहे . खेडेगावातील मुली ने या निकालाने श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे मुलीं पण IIT क्षेत्रा मध्ये पुढे आहेत . हे तिने अथक परिश्रमाने करून दाखवले . 1 ली 12 पर्यंत श्री अमरनाथ विद्यालय मध्ये शिक्षण घेतले असून ती श्री किसन धोंडीबा खंडागळे माजी केंद मुख्याध्यापक यांची नात असून, तिचे वडील श्री भालचंद्र किसन खंडागळे हे अमरनाथ विद्यालय येथे शिक्षक असून आई श्रीम टिपुगडे मॅडम या माळेवाडी येथे शिक्षिका आहे . तिचे काका संतोष किसन खंडागळे शिक्षक आहे व काकी राणी राऊत मॅडम या कर्जत मुले येथे शिक्षिका आहेत , या निवडीने तिचे सर्व क्षेत्रातुन कौतुक होत आहे . श्री अमरनाथ शाळेचे संस्थापक अध्यक्ष ,सचिव ,प्राचार्य तसेच सर्व शिक्षक , तालुक्याचे गटविकास अधिकारी ‘गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच सर्व शिंदा गावचे ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले . तिच्या निवडणीने मुलींन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .