प्रामाणिक कार्यकर्त्यांना आमदार रोहित पवार यांच्याकडे किंमत नाही… आरोप

कर्जत प्रतिनिधी:- कार्यकर्त्याच्या प्रामाणिकतेला आ.रोहीत पवार यांच्या कडे काहीही किंमत नाही ” अशी टिका करत श्री रमेश पवार यांचा भाजपा मध्ये प्रवेश
” प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांला आ रोहीत पवार हे कात्रजचा घाट दाखवतात . युवा कार्यकर्त्यांना संधी या नावाखाली उपद्रवी पिलावळ जमा करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कडून त्रास दिला जातो अशी विपरीत त्यांची कार्यशैली आहे .कार्यकर्ता हा नेत्यांशी प्रामाणिक असतो आणि नेत्याने सुद्धा कार्यकर्त्यांशी प्रामाणिक राहिले पाहिजे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असते त्यामध्ये गैर काय आहे?पण प्रामाणिक पणाला त्यांच्याकडे काडीचीही किंमत नाही . त्यांच्या या कार्यपद्घतीला कंटाळून मी पक्ष सोडत आहे . अशा शब्दांत टीका करत नवनिर्वाचित सिद्धटेक चे उपसरपंच श्री रमेशतात्या पवार यांनी आज आ .राम शिंदे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे भाजप मध्ये प्रवेश केला . विशेष म्हणजे मागील महिन्यात सिद्धटेक ग्रा पं . मध्ये भाजप आणि त्यांनी एकत्र येत सत्ता परिवर्तन घडवून आणले होते परंतु या सर्व घडामोडीत पक्ष मात्र सोडला नव्हता . आज त्यांनी आ .रोहीत पवार यांच्या कार्य पद्धतीवर कडाडून टीका करत कंटाळून आज राष्ट्रवादी ( शरद पवार गट )पक्षाला राम राम ठोकला …
तसेच तळवडी ताजु या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये भाजपा चे सरपंच सौ.शीतल एकनाथ तुरकुंडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . भाजपच्या विचार सरणीशी एकनिष्ठ राहून प्रामाणिक काम करा असा कानमंत्र आ . राम शिंदे साहेब यांनी सर्व कार्यकर्त्याना दिला .यावेळी श्री. एकनाथ तुरकुंडे , ग्रा.प.सदस्य श्री.ज्ञानदेव दराडे, श्री.निखिल बनसुडे , श्री.नानासाहेब पांडुळे श्री.काशिनाथ साबळे ,श्री.रघुनाथ तुरकुंडे ,श्री.बाबाजी गोयकर श्री.अल्ताफ शेख श्री. धनराज तुरकुंडे ,श्री.संपत साबळे उपस्थित होते. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मंगेश जगताप, व श्री वाल्मिक साबळे यांचे योगदान ही महत्वाचे आहे अशी भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली . .
यावेळी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन पोटरे ,तालुका अध्यक्ष श्री.शेखर खरमरे श्री. सुनील यादव श्री.प्रवीण घुले ,श्री.अशोक खेडकर,श्री.मंगेश जगताप,श्री.वाल्मिक साबळे , श्री.पोपट मोरे ,श्री.भाऊसाहेब सुपेकर श्री.अनिल गदादे,श्री.काका धांडे उपस्थित होते.