वाय.के. वडेवाले खाताका नेता शाखेला एक वर्ष पूर्ण – ग्राहकांसाठी खास ऑफर


कर्जत (प्रतिनिधी) कर्जत येथील वाय.के. वडेवाले शाखेला १९ सप्टेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या एका वर्षात असंख्य ग्राहकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या शाखेने दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.
या औचित्याने सर्व खवय्य ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत, फक्त एका दिवसासाठी उपलब्ध असलेल्या या ऑफरनुसार, एक जम्बो वडापाव फक्त १५ रुपयांत तर दोन जम्बो वडापाववर एक चहा मोफत देण्यात येणार आहे.

वाय.के. वडेवाले येथे नाश्त्यासाठी पोहे, उपमा, शिरा, मिसळपाव, वडापाव, उलटा वडापाव, पॅटीस, पुलाव यांसह चहा, कॉफी, लेमन टी आणि कोल्ड कॉफी यांसारख्या अनेक पदार्थांची उपलब्धता आहे.
शाखेतर्फे सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात आले असून, “या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट द्या,” असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.




