डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान प्रति तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कर्जत शहर बंद !

कर्जत, ता. : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान प्रति तोडफोड आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी या बंदचे आयोजन केले असून, दि. 17 डिसेंबर 2024 रोजी कर्जत शहर पूर्णतः बंद राहणार आहे.
या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी घटनांमुळे दलित समाजात प्रचंड संतापाचे वातावरण असल्याचे नमूद केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान प्रति तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले असून या बंदमध्ये व्यापारी, सामान्य नागरिक, आणि विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
भारतीय संविधान प्रति तोडफोड करणाऱ्यांवर आरोपींना त्वरित अटक.
या बंदमुळे कर्जत शहरात सार्वजनिक जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी दत्ता कदम आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष,विशाल काकडे आरपीआय युवक जिल्हा उपाध्यक्ष, अक्षय भैलुमे, भरत गुंड,शुभम माने, वसीम, धीरज पवार, सुरज इचके, प्रशांत होले, बापू डुकरे, सिद्धांत कदम, सुनील खरात, संघराज भैलुमे,अजय चौधरी, अवि आढाव, स्वप्निल वाटाणे, अभिजीत भैलुम, अमजद शेख, आदी उपस्थित होते…