वंचित राहिलेल्या गरजू शालेय विद्यार्थ्यांनाहि सायकलचे वाटप होणार : पै. शाम कानगुडे.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- आमदार झाल्यापासून मतदार संघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कोठेही मागे राहू नये या बाबींकडे विशेष लक्ष घातले. नुकताच मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने रोहित पवार यांनी अभिनव उपक्रम राबवला आहे या अनुषंगाने मतदारसंघातील तब्बल १० हजार ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ऍग्रो व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. असून पुढील टप्प्यात आणखी गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे तरी मतदार संघातील ५ वी ते १० वी वर्गातील ३ किलोमीटर घर ते शाळेतील अंतर असलेल्या गरजू विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या शिक्षकाकडे नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मा. सभापती पै. शाम कानगुडे यांनी शालेय गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना केले आहे.