कर्जत तालुक्यातील रेशन लाभधारक अध्याप धान्यापासून वंचितच!

राशीन (प्रतिनिधी):- जावेद कझी.महाराष्ट्रात सर्वत्र सर्वरच्या तांत्रिक समस्येमुळे महाराष्ट्रातील रेशन दुकानावर असणाऱ्या पॉश मशीन बंद असल्यामुळें राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रास्त भाव दुकानदारांना ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करण्यास मान्यता दिली आहे. अनेक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी पुरवठा विभागाकडून रविवारपासून रेशन दुकानावर शिधापत्रिका लाभधारकांना जुलै महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले आहे. मात्र कर्जत तालुक्यात रास्त भाव दुकानावर अद्याप धन्य वाटप सुरू झालेले
नसून याबाबत तहसीलदार गुरु बिरादार यांनी पाठपुरावा करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तांत्रिक समस्येमुळे राज्यातील रास्त भाव दुकानांमधून (impds) पोर्टल वरील (vnautomated) सुविधे मार्फत ऑफलाइनअन्नधान्य वाटप करण्याचा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा निर्णय झाला असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शिधापत्रिका धारक नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे पुरवठा विभाग व रास्त भाव दुकानदारांना निर्देश दिले गेले असून अध्याप कर्जत तालुक्यात शिधापत्रिका धारकांना धान्य मिळालेले नसल्यामुळे रेशन धान्य दुकानावरील धान्यावर अवलंबून असणारे आर्थिक परिस्थितीने गरीब गरजू सामान्य कुटुंबातील लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असून स्वस्त धान्य दुकान वर धान्य येण्याची वाट पाहताना दररोज दिसत आहेत.
तरी या जीवनाशी निगडित समस्येकडे तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून कर्जत तालुक्यात रास्त भाव दुकानात पुरवठा विभागाकडून धन्य पुरवठा लवकरात लवकर करावा अशी मागणी कर्जत सह राशीन परिसरातील नागरिकांकडून होत आहे.