तलवारीने हल्ला दोन जण गंभीर जखमी

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील बाबुळगाव दुमाला येथे तलवारीने हल्ला दोन जण गंभीर जखमी.कर्जत तालुक्यातील बाबुळगाव दुमाला येथे आज दुपारी दहा ते बारा जणांच्या टोक्याने तलवारीने विठ्ठल हनुमंत माळवदकर व हनुमंत साहेबराव माळवदकर यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीरित्या जखमी झाले आहेत आणि त्यांना भिगवण येथे रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
या हल्ल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस प्रशासनाने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे याची माहिती दिल्यामुळे नागरिकाही सतर्क झाले होते त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोर त्यांची चार चाकी गाडी क्रमांक एम एच 42 बी बी 9810 ही घटनास्थळी सोडून पळून गेले आहे.
दरम्यान हा हल्ला कशामुळे झाला याची नेमके कारण अद्याप समजले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली