दुभाजकाला धडकून राशीन येथे ट्रकचा भीषण अपघात दैवबलवत्तर म्हणुन सर्व सुखरूप

राशिन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- बारामती अमरापुर महामार्गावर राशीन कदम वस्ती येथे रात्रीच्या वेळेस भिगवण वरून कर्जतच्या दिशेने MH 16.CA 5050 ट्रक जात असताना दुभाजक दिसला नसल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला दरम्यान ट्रक मधील जड लोखंडी पाईप व भंगार एका साइडला आल्याने ट्रक उलट्या साइडला जाऊन पडला केबिन मधील वाहन चालक सुखरुप ट्रक च्या बाहेर आला रात्री 10.30 च्या सुमारास हि घटना घडली राशीन परिसरातील भिगवण चौक ते सिद्धटेक बायपास या रस्त्यावर गतिरोधक व स्टोपर.
रिफ्लेक्टर चे बोर्ड नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे स्टोपर व रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी राशीन चे समाज सेवक शेखर जाधव करीत आहेत सध्या अनेकांकडे स्टायलिश गाड्या आहेत कोणत्याही प्रकारचा विचार न करता तरुण धूम स्टाईलने वाहन चालवित आहेत कर्कश हॉर्न चे आवाज मोठ्या प्रमाणत वेग त्यामुळे इतर वाहन चालक चलबिचल होऊन अपघातांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्या तरुणांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे तसेच याच रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघात ग्रस्त ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर बोर्ड, टॉपर, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांनी तात्काळ बसावेत अशी मागणी समाजसेवक शेखर जाधव यांनी केली आहे.