दलित युवकाच्या हात्येचा कर्जत येथे आरपीआय च्या वतीने निषेध

कर्जत (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केल्याचा राग मनात धरून तेथील गाव गुंडांनी अक्षय भालेराव या तरुणाचा खून केला असून या गावगुंडांवर कठोर कारवाई करून मयताच्या कुटुंबीयास आर्थिक मदत मिळणे बाबतचे निवेदन कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष संजय भैलुमे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कर्जतचे तहसीलदार गणेश जगदाळे तसेच कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की दि. १ जून २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील दलित तरुण अक्षय भालेराव या तरुणाने त्यांच्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून गावातील काही गाव गुंडांनी अक्षय भालेराव यांची निर्गुण हत्या केली आहे. तरी या घटनेचा कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की सदरच्या घटनेची चौकशी सीबीआय किंवा सीआयडी यांच्या मार्फत करण्यात येऊन सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडित कुटुंबाला राज्य सरकारने पन्नास लाख रुपयांची मदत करावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, विक्रम कांबळे, सागर कांबळे, लखन भैलुमे, नंदकुमार गाडे, रमेश आखाडे, सचिन कांबळे, देवा खरात, बाळासाहेब भैलुमे, प्रवीण भैलुमे, बंडा भैलुमे, निलेश काकडे, आकाश साळवे, नितीन भैलुमे, करण ओव्हळ, संतोष आखाडे, विजय साळवे, महादेव कटारे, नागेश घोडके, मयूर चौधरी, मच्छिंद्र रंधवे, सोमनाथ गोरे, लक्ष्मण पवळ व भरत चिंधे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत