नाशिक येथे भाजपा अल्पसंख्यांक कार्यकर्ता संवाद संमेलन बैठक संपन्न.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने रविवार दिनांक. ६/८/२०२३ रोजी नाशिक येथे
स्व. प्रभाकर (बंडोपंत) जोशी या सभागृहा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्हा कार्यालयात.मा. श्री इद्रीस मुलतानी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उत्तरेतील सहा जिल्ह्यांचे कार्यकर्ता संवाद संमेलन दुपारी १ ते ४ या वेळेत २०० हुन अधिक नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत काम कसे करायचे तळागाळातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून कशा देता येतील.
अनेक विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य कसा मिळेल याचा प्रयत्न आपण करावा, मुद्रा, प्रधानमंत्री स्वास्थ विमा योजना, रेशन दुकानावरील मोफत धान्य मिळण्यासाठी वंचित लाभार्थ्यांना मदत करणे तसेच इतर योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना कसा देता येईल यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष माननीय इद्रीस मुलतानी व इतर मान्यवर नेत्यांनी या कार्यकर्ता संवाद संमेलन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी जनहितार्थ काढलेल्या विविध योजनेचा लाभ वंचितांपर्यंत कसा पोहोचला जाईल याविषयी माहिती सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या युवक व महिलांनी या कार्यक्रमास सहभाग नोंदवला होता. यावेळी सुलताना खान अध्यक्ष प्रभारी अल्पसंख्यांक मोर्चा नाशिक जिल्हा, एजाज शेख. प्रभारी अल्पसंख्यांक अध्यक्ष महाराष्ट्र, आतीक खान सरचिटणीस अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र.
सलीम बागवान, उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा, रेश्मा शेख उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश. शोएब काझी असंख्य्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष अ. नगर. अल्ताफ शेख जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा अ.नगर, जमीर काझी, शरीफ काझी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.