दादा पाटील महाविद्यालयात बुक बँक योजना

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय विभागामार्फत बुक बँक योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थी घेतात. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना पुस्तके घेणे शक्य नाही, शिक्षणामध्ये अडचणी येतात त्यांना महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून पुस्तके दिली जातात. यासाठी फक्त १५० रुपये भरून पुस्तकांचा पूर्ण संच शैक्षणिक वर्षासाठी दिला जातो.
या पुस्तकांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी चांगले प्राविण्य मिळवावे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. बबन कुंभार यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, उद्योजक दीपकशेठ शिंदे, ग्रंथपाल प्रा. बबन कुंभार, प्रा. मोहन खंडागळे, प्रा. सुनील देशमुख, प्रा. प्रवीण घालमे, श्री. अनिल गांगर्डे श्री. मुन्ना शेख, प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. सावंत मॅडम, सौ.दिपाली भैलुमे हे उपस्थित होते.