मा.आमदार रोहित पवार यांच्या एमआयडीसी मागणी समर्थनार्थ राशीन मध्ये राष्ट्रवादीचे भव्य रस्ता रोको व धरणे आंदोलन.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे मा. कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या पाटेगाव व खंडाळा येथे एमआयडीसी हाेण्याच्या समर्थनास पाठिंबा दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले चौकात रस्ता रोको धरणे आंदोलन करण्यात आले. प्रथमता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित होत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत भव्य रस्ता रोकोचा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून निघत महात्मा फुले चौकापर्यंत घोषणा बाजी करत हलगी ताशाच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आला. महात्मा फुले चौक येथे पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुमारे दीड तास रास्ता रोको धरणे आंदोलन माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या एमआयडीसी बाबतच्या मंजुरी समर्थनास अनेकांनी पाठिंबा दर्शवला. कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव आणि खंडाळा येथे एमआयडीसी ला मंजुरी मिळवी यामुळे कर्जत- जामखेड तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागेल.
तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. या दृष्टीने माननीय आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव व खंडाळा येथे एमआयडीसी मंजूर करून आणली आहे, परंतु शासन स्तरावरून अधिसूचना निघत नसल्यामुळे हा कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य नागरिक युवक , युवती विद्यार्थी, महिला ,नागरिक, या सर्वांना होणारा अन्याय आहे. विकास कामाला अडखुटा पाय न घालता पाटेगाव व खंडाळा येथे एमआयडीसी ला शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळावी असे सर्वानुमते भाषणात अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले .यावेळी बाळासाहेब साळुंके, विजय नाना मोढळे, अँड. सुरेश शिंदे, ए.बी मोरे पाटील, राम कानगुडे ,माऊली सायकर, गणेश कदम, प्रसाद मैड, रवींद्र पाडोळे, तुषार सुळ, रामचंद्र भोसले, अमोल भोसले, आदींची यावेळी भाषणे झाली.
या रोस्ता रोको व धरणे आंदोलनाचे नेतृत्व. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आले.यावेळी मा.सभापती श्यामभाऊ कानगुडे मा.उपसरपंच शाहू राजे राजे भोसले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल शेटे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजिरे, भास्कर मोढळे, संजय मोढळे, चमस थोरात, रामकिसन साळवे, राजेंद्र ढावरे, पवन जांभळकर, बापू धोंडे, संजय सुद्रिक, इमरान शेख ,आजिनाथ मोढळे, धनंजय जगताप, हनुमंत भांडवलकर तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको नंतर मंडल अधिकारी विश्वास राठोड यांना निवेदन देण्यात आले. या रस्ता रोको दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सालगुडे, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल, अर्जुन पोकळे, पोलीस पोलीस मित्रांनी चाेख बंदोबस्त ठेवला. सूत्रसंचालन व आभार तुषार ईश्वर गुळमे सर यांनी व्यक्त केले.