जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा राशिन येथे भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- भारत देशाचा अनमोल हिरा, मिसाईल मॅन म्हणून जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले मा. राष्ट्रपती भारतरत्न डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या गुरुवार दि. २७.७.२३. रोजी पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा राशीन येथे माजी.सरपंच/ हशू अडवाणी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन एस. काझी, युवा नेते भीमराव साळवे व इतर मान्यवरांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उर्दू शाळेतीलअनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून कलाम यांच्या अनमोल आठवणींना उजाळा देत मराठी,उर्दू ,इंग्रजी, मध्ये या प्रसंगी भाषणे केली. यावेळी साहारा मोटर्सचे संस्थापक जमीर काझी, वायरमन इलाई पठाण, आलिम अब्दुल राैफ, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मेहराज मोमीन, शिक्षक मोमीन हुसेन बादशहा शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .शेवटी मुख्याध्यापक मेहराज मोमीन यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.