ब्रेकिंग
दादा पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दत्तू शेंडे यांनी मार्गदर्शन केले. समशेर कॉम्प्युटरचे संचालक समशेर शेख यांनी यानिमित्ताने भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. सागर शिंदे, डॉ. वाल्मीक कापसे, डॉ. कैलास रोडगे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे यांनी मानले. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.