कर्जत नगरपंचायत हद्दीतील समर्थ गार्डनच्या कंपाऊंडचे नुकसान ; गुन्हा दाखल

समृध्द कर्जत/ (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायत हद्दीतील समर्थ गार्डनच्या कंपाऊंडचे अज्ञात महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींनी नुकसान केले. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नगरपंचायतचे कर्मचारी रवींद्रकुमार सुधाकर नेवसे यांनी या प्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, मी नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोडमल यांच्यासोबत समर्थ गार्डन येथे गेलो. गार्डनच्या गेटचे कुलूप लावलेले असताना महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कंपाउंडचे लोखंडी ग्रील तोडून नुकसान केले. त्यांच्याविरुद्ध कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समर्थ गार्डनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून नुकसान केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी समर्थ गार्डन येथे दिवसा तीन वेळा व रात्री नऊ ते दहा या वेळेत पोलिसांनी गस्त घालावी या मागणीचे निवेदन कर्जत पोलिसाना दिले असल्याची माहिती नगरपंचायतच्या पाणीपुरवठा विभागाची सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी दिली.