परब्रम्ह संगीत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व संगित मैफिल कार्यक्रम

कर्जत (प्रतिनिधी) :- प्रभाग क्रमांक 8 मधील शिक्षक कॉलनीतील परब्रम्ह संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व संगिता मैफिल कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यालयात एप्रिल-मे 2023 मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व सत्कार करण्यात आले. यामध्ये गायन विषयात अनिल मंडलिक, ईश्वरी लवांडे, राजवीर लाड आणि स्वाती लोखंडे यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. तर तबला या विषयात ओंकार मुळे आणि ऋषिकेश लोखंडे यांनी विशेष योग्यता मिळवली आहे पार्थ लवांडे व राजाराम माने यांनी प्रथम श्रेणी मिळवून यश मिळवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक व मार्गदर्शक संजय तुपे, कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.देवराम लगड, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, प्रकाश नेटके (तबला विशारद), मार्गदर्शक जानवी नेटके या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांनी अभिनंदन केले तसेच परब्रम्ह विद्यालयास पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या, संजय तूपे सरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना संगीत जीवनास उपयुक्त व तणावमुक्तीस कसे उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपआपली कला सादर. केली. यावेळी गिरीज नेटके, ओंकार मुळे, ऋषिकेश लोखंडे पार्थ लवांडे यांनी तबला वादन सादर केले तर जानवी नेटके, ओवी नेटके, ईश्वरी लवांडे, राजवीर लाड यांनी गायन सादर केले. अनिल मंडलिक यांनी गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरल यावेळी संगीत अलंकार संजय तूप, संतोष अनभुले यांनी गायन केले. तबल्यावर साथसंगत विद्यालयाचे तबला मार्गदर्शक
प्रकाश नेटके यांनी केली. यावेळी पालक, सुभाष लवांडे, अशोक घालमे, नामदेव पाचारणे, प्रविण परदेशी, किरण कोल्हे, राजीव राठोड, भैरू घालमे, सुधीर खरमाळे, अशोक जाधव,विजय थोरात, काकासाहेब हरकटे, सचिन लोंढे, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष सोनवर, सोमनाथ अनारसे, पांडुरंग गांगर्डे, संतोष अनभुले, गणेश अनारसे, कोळगे सर, झिजे सर, वायसे सर, संतोष घिरडे, शरद पवार, संतोष खांदवे, ज्ञानदेव शेटे, आजबे ज्ञानेश्वर, सुपेकर मेजर, स्वप्नील शिंदे, सुधिर शिंदे, कोळेकर रमेश, संदिप जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल मंडलिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश नेटके यांनी मानले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्कार समारंभाने करण्यात आली. यावेळी गुरुवर्य संजय तुपे यांचे गुरुपुजन करण्यात आले, तसेच गटशिक्षणाधिकारी देवराम लगड आणि नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांचा सत्कार करण्यात आला.