राशीन मध्ये मैत्री कट्टा चिकन टिक्का ,बिर्याणी, चायनीज सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे मैत्री कट्टा चिकन टिक्का बिर्याणी अँन्ड चायनीज सेंटर
चे उद्घाटन आज सकाळी 11 वाजता. राशीन गावचे माजी सरपंच शाहूराजे राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व मार्केट कमिटी नूतन संचालक राम कानगुडे, माजी सरपंच रामकिसन साळवे, भाजपा भटक्या विमुक्त सदस्य तात्यासाहेब माने, भाजपा शहराध्यक्ष एकनाथजी धोंडे, नितीन कानगुडे, जालिंदर मोढळे, कल्याण जंजिरे, गणेश माेढळे, विजय सोनवणे सोहेल बागवान , सक्सेस कॉम्प्युटर क्लासचे संचालक पंकज लांगाेरे सर व कर्मचारी वृंध्द इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मैत्री कट्टा चिकन बिर्याणी टिक्का चायनीज सेंटरचे मालक अन्सार दस्तगीर शेख यांनी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांची हार्दिक आभार मानले, तसेच आपण ही कारागिरी कला नगर येथे हस्तगत गेली असून राशिन मधील मैत्री कट्टा या चायनीज सेंटर मध्ये खावैयांना आवडेल असे चविष्ट स्वाद असणारे उत्कृष्ट दर्जाचे नामांकित चिकन चायनीज बिर्याणी , टिक्का, इतर पदार्थ फ्रेश व ताजे कॉलेटी युक्त देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करू असेही यावेळी अन्सार दस्तगीर शेख यांनी सांगितले.