मा. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राशिन मध्ये शेतकऱ्यांना मोफत पिक विमा मोहीम संपन्न.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- माननीय कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व एकात्मिक विकास संस्थेच्या संयुक्त माध्यमातून राशिन येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर राशिन व परिसरातील शेतकऱ्यांना पिक विमा योजना खरीप हंगामा २०२३-२४ मोफत काढून देण्याची मोहीम आज सकाळी ८ ते दुपारी १२ त्या वेळेत राबविण्यात आली. यावेळी राशीन व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या मोफत पिक विमा योजनेचा लाभ घेत कागदोपत्री पूर्तता रोहित दादा पवार संपर्क प्रतिनिधी अजय शेलार यांच्याकडे जमा केली. यावेळी राशीन व परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, युवा नेते भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, स्वप्निल मोढळे ,दीपक थोरात , अल्लाउद्दीन काझी, विठ्ठल गायकवाड , विश्वनाथ काळे ग्रामपंचायत कर्मचारी जितू आढाव, दया आढाव, बाळू पंडित, घोडके साहेब, तसेच राशीन व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ज्या शेतकऱ्यांनी विम्यासाठी लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे आणून दिले आहेत त्यांना तीन-चार दिवसांनी पिक विमा भरल्याची रिसीट देण्यात येईल. तसेच उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनी मोफत पिक विमा भरण्यासाठी आमदार रोहित दादा पवार संपर्क कार्यालय कर्जत ऑफिसला जाउन मोफत पिकविण्यासाठी कागदपत्रे पूर्तता प्रतिनिधी अजय शेलार,
७६२०८३०४४ ,व कर्जत ऑफिस ७४९८९०५४९७,या मोबाईल नंबर वर संपर्क करावा. तसेच
आवश्यक लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे.
१) ७×१२, ८अ, उतारा.
२) स्वयंघोषणापत्र.
३) बँक पासबुक झेरॉक्स.
४) आधार कार्ड झेरॉक्स.
५) मोबाईल नंबर आवश्यक.
शेतकऱ्यांच्या अशा नैसर्गिक बिकट परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना व वरून राजा रुसला असताना शेतकऱ्यांची आर्थिक वडातान लक्षात घेता रोहित दादा पवार यांनी जी मोफत पिक विमा भरून पुणे देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवार यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे.