चापडगावच्या लॉन्ड्री चालकाचा मुलागा झाला पोलीस उपनिरीक्षक

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- जगण्याचा संघर्ष करत भटकंती सुरू असताना एक कुटुंब काही वर्षांपूर्वी चापडगाव मध्ये स्थिर झाले. त्यांनी लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच बाहेरून आलेले हे कुटुंब चापडगावकर झाले. आज याच कुटुंबातील मुलाने चापडगावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. चापडगाव आणि आसपासच्या गावातील लोकांचे कपडे धुऊन, इस्त्री करून सेवा देणारे कोटला हे कुटुंब. पिढ्यान पिढ्यांचा अशिक्षितपणा, अत्यंत कष्टाने, जिद्दीने आणि विश्वासाने मुलांना शिक्षण दिल्यामुळे आज या कुटुंबातील भीमसेन शेखर कोटला याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे.
अधिकाऱ्यांचे गाव म्हणून चापडगाव ओळखले जाते. गावचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत. भीमसेनच्या कुटुंबाची सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता त्याने मिळविलेले यश हे खूप मोठे आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून अशा पद्धतीने यश मिळवणे सोपे नसते. गेली दोन पिढ्या परिसरातील लोकांची सेवा करणाऱ्या, कमी कालावधीत चापडगावकर झालेल्या या कुटुंबातील मुलाने मिळवलेले यश सर्व चापडगावकरांसाठी अभिमानास्पद आहे.
भीमसेन शेखर कोटला यांचा सत्कार ॲड विकास शिंदे,माजी उपसरपंच विश्वासराव
शिंदे, कर्जत नगरपंचायत चे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल,भूषण शिंदे, पेट्रोलियम चे संचालक युवराज देवकर,शिवाजी शिंदे, दादासाहेब सबकाळ, कांतीलाल साबळे, तसेच चापडगावतील मित्रपरिवाराच्या उपस्थित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या