राशीन कुकडी ऑफिस काटेरी बाभळींच्या दाट विळख्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील कुकडी ऑफिचे स्थलांतर कोळवडी येथे झाल्यामुळे राशीन येथील ऑफिसेस व घरे बऱ्याच वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे व संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारची देखरेख स्वच्छता टापटीत नसल्यामुळे काटेरी बाभळीचे कुंपण दाट स्वरूपात वाढल्यामुळे साप, नाग, विंचू, व इतर विषयाची प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यामुळे परीट वाडी कुंभारगाव इतर वाड्यावर त्यांना जाणाऱ्या व मॉर्निंग वॉक साठी सकाळ संध्याकाळ जाणाऱ्या नागरिकांना काटेरी दाट बाबळीत वास्तव्य करणाऱ्या विषारी प्राण्यांचा धोका वाढलेला आहे. यामुळे वेळीच संबंधित विभागाने सतर्कता बाळगुन वाढलेल्या दाट काटेरी बाबळी काढून त्या ठिकाणची स्वच्छता राखावी अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता काटेरी बाबळी काढून स्वच्छता राखावी असे राशीन व इतर परिसरातील नागरिकांचे मत आहे.