राशिन मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा दाखवत जगदंबा विद्यालयातील साठलेल्या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यास ईदगाह मैदानातून दिली मोकळीकतेची वाट.

राशिन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन येथील मुस्लिम समाजाचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या ईदगाह मैदानात मागील दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बारामती अमरापुर या राज्यमार्गाच्य रस्त्याचे काम चालू असताना तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक विभागाकडून मुस्लिम समाजाच्या ईदगाह जागेतून पावसाच्या पाण्याच्या व गावातील सांडपाण्याचा प्रवाह काढण्यात आला होता
मात्र रस्ता झाल्यानंतर सार्वजनिक विभागाने दुर्गंधीयुक्त पाण्याची दखल न घेतल्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने सध्या वाहत असलेले गटारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे हे दुर्गंधीयुक्त पाणी श्री जगदंबा विद्यालय राशीन च्या आवारात घुसले व विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक यांना विद्यालयात जाणे येणे कठीण झाले
तसेच काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दूषित पाण्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांची काळजी स्वरूपात तात्पुरते शाळेत येणे जाणे बंद केले, शाळेत सर्वत्र दुर्गंधी सुटली असता विद्यालयाचे प्राचार्य खंडागळे सर व परवेक्षक राजेंद्र साळवे यांनी दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत राशिन ला पत्र दिले. या विषयावर मुस्लिम समाजातील काही प्रमुख व्यक्ती शालेय कमिटी सदस्य व सर्वपक्षीय पदाधिकारी यांची मीटिंग बोलवण्यात आली.
या मध्ये शालेय कमिटी सदस्य शाहू राजे भोसले, रामकिसन साळवे, उपसरपंच शंकर देशमुख , भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे , अशोक जंजिरे , दीपक थोरात , नाजीम काझी , पत्रकार जावेद काझी, बबलू भाई कुरेशी , जब्बार बागवान , राजू भाई शेख , संतोष सरोदे , प्रवेक्षक राजेंद्र साळवे , या सर्व मान्यवरांचे उपस्थित विद्यालयात मीटिंग घेण्यात आली, या मीटिंगमध्ये जगदंबा विद्यालयातील दूषित पाण्याचा प्रवाहामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता मुस्लिम समाजाच्या उपस्थित मान्यवरांच्या वतीने मनाचा मोठेपणा दाखवत ज्ञानमंदिर असलेले श्री जगदंबा विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंद केलेली दुर्गंधी गटार पाण्याची वाट अंडरग्राउंड सिमेंट पाईप टाकून चालू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. दिलेल्या शब्दाचे पालन करीत सरपंच नीलम साळवे व ग्रामपंचायत सदस्य नाझीम काझी यांच्या हस्ते अंडरग्राउंड सिमेंट पाईप टाकण्याच्य कामाचा शुभारंभ करण्यात आला असून सिमेंट पाईप बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे यावेळी रामकिसन साळवे, कॉन्ट्रॅक्टर मतीन शेख, बबलू भाई कुरेशी, मुज्जू काझी, शकील भाई शेख, परवेक्षक राजेंद्र साळवे, जुनेद काझी, वाजिद फिटर, तर मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.