भाजपा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या राशीन मध्ये सत्कार

राशीन प्रतिनिधी जावेद काझी :- आज राशीन शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी च्या नवनियुक्त पदाधीकार्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या मध्ये प्रामुख्याने भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष शेखर खरमरे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुनिल काका यादव व अनुसुचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष गणेश पालवे या नवनियुक्त पदाधिकार्याचा सत्कार भाजपा सेना व सर्व समविचारी मित्र मंडळा तर्फे करण्यात आला यात प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक साहिल दादा काझी व जिल्हा अध्यक्ष सोयब काका काझी हे होते.
यावेळी भाजपा युवा नेते पै.बंडा भाऊ मोढळे,पै.शिवाजी चोरमले,शक्ती केंद्र प्रमुख रवी दंडे,नानासाहेब शेटे,शिवसेना शहर प्रमुख दिपक जंजीरे,गण प्रमुख विकास काळे,युवा सेना प्रमुख योगेश भवर,राहुल गाडे,मोटार वाहन प्रमुख धनंजय देशमाने,दादासाहेब लोंढे,जेके मोटर्स चे संचालक जाकिर भाई काझी,युवा मोर्चाचे अमोल काळे, बिल्डर रियाज सय्यद,वसीम काझी,सद्दाम काझी,शहबाज काझी,जोयब काझी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सर्वांचे आभार इंजी.युवा उद्योजक सोहेल भाई काझी यांनी मानले यावेळी सर्व भाजपा-सेना मित्र पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.