ब्रेकिंग
अशोक जायभाय यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी व नानासाहेब निकत यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
कर्जत (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत तालुक्यातील दोन नेत्यांना पक्षाच्या महत्वपूर्ण पदावर नियुक्त्या दिल्या आहेत. दुरगावचे माजी सरपंच अशोक जायभाय यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी व नानासाहेब निकत यांची जिल्हा सरचिटणीस नियुक्ती केली आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गुंड, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे उपस्थित होते.