दूध प्रश्नासाठी अशोक खेडकर दिनांक 18 डिसेंबर रोजी करणार तहसील पुढे आमरण उपोषण

कर्जत : दुधाचे दर खाली आल्याने शेतकऱ्याना मोठा भुर्दंड सहन करावा लागत असून या प्रश्नावर शासनाने तातडीने लक्ष देऊन दधाचे दर वाढवावेत अथवा दूध उत्पादकाला थेट आठ ते दहा रू अनुदान द्यावे, याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा अन्यथा दि १८ डिसे पासून कर्जत तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आमरण उपोषण करू असा थेट इशारा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर यांनी निवेदनाद्वारे दिला असून सदरचे निवेदन देण्यासाठी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
मागील दिड महिन्यापासून झालेली असूनवपशुखाद्याचे १० रुपयांनी कमी झालेले दर ही वाढलेले असून दुधाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील भाव गडगडल्याने शेतक-यांना शेतकऱ्यांना जनावरे दूध व्यवसाय करणे अत्यंत जगविण्यासाठी प्रचंड मनस्ताप हलाखीचे झाले आहे. सहन करावा लागत आहे. खाजगी दुध प्रकल्पवाले तालुक्यामध्ये चारा टंचाई युनियन करुन शेतकऱ्यांचे
दुध २५ रू लिटरने खरेदी करुन शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. तरी शासनाने यासंदर्भात त्वरीत लक्ष घा- लून दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर रु ४० प्रमाणे बाजार भाव मिळावा यासाठी आद्यादेश काढून खाजगी प्रकल्प व सहकारी संस्थाना बंधनकारक करावे. सध्या वाढलेले पशुखाद्य चाऱ्याचे
वाढलेले भाव, पशुवैद्यकीय औषधे महाग झाली आहे, जनावरांचा संगोपन खर्च खूप वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दुध धंद्यात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून दुध उत्पादकांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. या प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे,
शासनाने दुध उत्पादकांना प्रति लिटर रु ८ तेर १० अनुदान थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर देण्यात यावे या मागणीसाठी कर्जत तालुक्यात अशोक खेडकर मित्र मंडळ यांच्या बती ने कर्जत तालुक्यातील दध उत्पादक शेतकरी यांना बरोबर घेऊन सोमबार दि १८ डिसे पासून कर्जत तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहोत असे निवेदन अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसी लदार यांना देण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, काकासाहेब धांडे, मंगेश जगताप पाटील, दादासाहेब खराडे,रावसाहेब,शरद यादव,संदीप शेगडे, नवनाथ लष्कर, रामजी पाटील, बाळास हेिब निंबाळकर, रघुनाथ ढेरे, सर्जेराव कबडे, अगस्ती नलावडे, जयराम खेडकर, लह भिसे, सुभाष गायकवाड, डॉक्टर धनंजय आरडे, दीपक काकडे, सुभाष गायकवाड,अमोल तोरडमल,चंद्रशेखर पठाडे,संदेश देशमुख,मनोज तोरडमल, बाबुराच तोरडमल, महेश गांगडे, जयसिंग वाघमोडे, धुळ्याची खांडेकर, आबासाहेब खांडेकर, बबनराव खळगे, पोपट चटाले, पानचंद ढेकळे, हनुमंत खोसे, तुळशीराम कारंडे, अंकुश दळवी, आदि अनेक दूध उत्पादक, शेतकरी यांच्या निवेदनावर सह्या आहेत. शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नात भाजपाचा या विषयाला पाठिंबा असून शासनाने याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही ही पाठपुरावा करत आहोत, महायुती सरकारमध्ये भाजपा जरी घटक पक्ष असला तरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहणार असून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे असे मत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी व्यक्त केले. तर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी पक्ष बाजूला ठेऊन आपण लढा देणार आहोत. याप्रश्नी अमरन उपोषण करताना हा प्रश्न सुटे पर्यत मागे हटणार नाही असा इशारा अशोक खेडकर यांनी दिला असून फक्त निवेदन देण्यासाठी येवढे लोक येत असतील तर आंदोलनात किती लोक सहभागी होती यांचा अंदाज बांधा यावरून हा प्रश्न किती गंभीर होते हे पहावयास मिळते असे खेडकर यांनी म्हंटले आहे