राशिन येथील सहारा मोटर्स च्या वतीने सलाम इंडिया पुरस्काराने सन्मानित जावेद काझी यांचा भव्य सत्कार.

कर्जत(प्रतिनिधी) :- टी.एम .सी. क्रिएशन्स व एम. व्ही एस. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्य कर्तृत्व सन्मान महोत्सव सोहळा नवी मुंबई वाशी येथे 28 मे 2023 रोजी संपन्न झाला.
या भव्य दिव्य कार्यक्रमात समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी यांना सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या मिळालेल्या पुरस्कारामुळे उत्साहीत होत सहारा मोटर्स चे संस्थापक अध्यक्ष तसेच मरकज मस्जिदचे विश्वस्त जमीरभाई अबूताहेर काझी यांच्यावतीने इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जावेद काझी यांचा फेटा, बांधून हार, गुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच हशु अडवाणी विद्यालयाचे संचालक मोहसीन(गुड्डू) अल्लाउद्दीन काझी.
यांनी देखील जावेद काझी. त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शोएब काझी, राजू भाई शेख, बबलू भाई कुरेशी, मुन्नाभाई काझी, ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, शरीफ काझी, जोयब काझी, वसीम शेख, निहाल काझी, साेहेल काझी, सचिन साळवे, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.