जगदंबा विद्यालयाचा निकाल ९४.६४ टक्के

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा विद्यालयाचा निकाल ९४.६४ टक्के लागला आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एकूण ३३६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. पैकी १०६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी, प्रथम श्रेणीमध्ये १११ विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीमध्ये ८५ विद्यार्थी, तर पास श्रेणीमध्ये १६ विद्यार्थी आले आहेत. ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे १२ विद्यार्थी आहेत.
यावर्षी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. रुक्मिणी बापू राऊत ९३.६० टक्के प्रथम, सुरवसे श्रद्धा प्रदिप९३.०० टक्के द्वितीय, कदम साक्षी श्रीकांत ९२.८० टक्के तृतीय.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मुख्याध्यापक दिलीप खंडागळे, उपमुख्याध्यापक गणपत तावरे, पर्यवेक्षक नवनाथ सोनवणे व राजेंद्रकुमार साळवे, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य शाहूराजे राजेभोसले, विकास मोढळे, रामकिसन साळवे, जनरल बॉडी सदस्य आ.रोहित दादा पवार राजेंद्र फाळके,विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर उपविभागीय अधिकारी शिवाजी तापकीर व काकासाहेब वाळुंजकर, ग्रामस्थ, पालक आदींनी अभिनंदन केले.