राशिन मध्ये अनेक गणेश मंडळाने आज केले गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे अनेक गणेश मंडळाच्या वतीने ढोल ताशा डीजे बँड च्या तालावर ठेका धरीत फटाकड्याची आतिश बाजी करत विविध कार्यक्रमाचे आयोजन करत अनेक गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाचे मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . यावेळी गेल्या 65 वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक दाखवणारा जगदंबा देवीच्या प्रारंगनाथ बसणारा सदिच्छा मित्र गणपती मंडळाच्या वतीने आज विसर्जनाच्या दिवशी सर्व गावकऱ्यांना पाच पक्वान्न जेवण देण्यात आले.
तसेच गणपती काळात प्रत्येक दिवशी गणेश मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच शिवशक्ती युवा प्रतिष्ठान राशीन च्या वतीने गणपती बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक करण्यात आली मध्ये 70 कलाकारांचे ढोल पथक आदिवासी धम्माडी नृत्य हलगी ढोल ताशा चंद्रयान तीन ३ ची मनमोहक कलाकृती डोळ्याची पारने खेळणारी होती.
तसेच श्रीमंत भोलेनाथ तरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांनी भगवा फेटा प्रदान करीत बँडच्या सुमधुर तालावर वाजत गाजत निघाली होती. तसेच न्यू भारत गणेश मित्र मंडळ इंदिरानगर राशिन च्या वतीने नाविन्यपूर्ण अनोखा उपक्रम करीत संकल्प वस्तीगृहाच्या अनाथ गरीब गरजू मुलांना सभापती पैलवान श्याम कानगुडे यांच्या हस्ते मंडळाच्या गणेश भक्तांकडून जेवण देण्यात आले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक विविध मंडळाच्या वतीने काढण्यात आली.