हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कर्जत येथे रक्तदान शिबिर व भव्य जुलूस मिरवणूकीचे आयोजन.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.संपूर्ण जगाला एकात्मिकेचा संदेश देणार जगविख्यात मुस्लिम समाजाचे धर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या (ई-ए-मिलादुन्नबी नबी) जयंतीनिमित्त कर्जत तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक १९/९/२०२४ रोजी सकाळी ९.३०ते सायंकाळी ५. या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
तरी तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस जामा मस्जिद ट्रस्ट कर्जत यांच्यावतीने हेल्मेट व पाण्याचा जार भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २०/९/२०२४. सकाळी सिविल हॉस्पिटल व स्नेह प्रेमी अनाथ आश्रम कर्जत येथे फळे किराणा सामान व आश्रमातील151 मुलांना कपडे वाटप करण्यात येणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता. मोहम्मद पैगंबर यांच्या ईद-ए-मिलादुन्नबी जयंती निमित्त(*जुलूस*) मिरवणूक जामा मस्जिद कर्जत येथून सायंकाळी ५.३०वा. निघणार आहे जुलूस दरम्यान ११०० किलो मिठाईचे वाटप हिंदू मुस्लिम बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती कर्जत तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती कर्जत चे नगरसेवक रज्जाक भाई झारेकरी यांनी दिली.