जुन्या गटार हद्दीपर्यंत रस्ताचे काम होऊ द्या! राशिनकरांची आ.रोहित पवार व संबंधित अधिकाऱ्यांना मागणी.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन येथे माननीय आमदार रोहित दादा पवार व संबंधित अधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता भक्ती निवास येथे दौंड उस्मानाबाद रस्त्याच्या कामासंदर्भात सिद्धटेक ते कोर्टी हद्द सिमेंट काँक्रीटी करण रस्त्याचे काम सुरू झाले असून या रस्त्यालगतच्या गावकऱ्यांच्या समस्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी माननीय आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली.
यावेळी सिद्धटेक, भांबोरा, बारडगाव येसवडी, राशीन ,चिलवडी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्या त्या भागातील ग्रामस्थांनी तेथील समस्येची प्रश्नावली आ. रोहित पवार व संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडली. सिद्धटेक ते राशीन पहिल्या टप्प्याचे काम आधीमन डेव्हलपमेंट बँक अंतर्गत मंजूर झाले असून दुसऱ्या टप्प्यात राशीन ते कोर्टी जिल्हा हद पर्यंत जवळपास 35 किलोमीटर सिमेंट काँक्रेट रस्ता होणार असून रस्त्याची रुंदी दहा मीटर असणार आहे यासंदर्भात राशिन येथील दुकानदार, व्यापारी, व इतर ग्रामस्थांच्या मते सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नवीन
बांधलेल्या गटार अंतर्गत रस्ता न करता पूर्वीच्या जुन्या गटारी अंतर्गत म्हणजेच दहा मीटर चा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही साईटने दीड मीटर गटार, तसेच दोन्ही बाजूने दोन मीटर फुटपाट असे राशिन मुख्य बाजारपेठेतून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे असे झाल्यास वाहतुकीस अडचण येणार नाही असे मत पै. श्याम कानगुडे, उपसरपंच शंकर देशमुख, गणेश कदम, औदुंबर देवगावकर, व इतर ग्रामस्थांनी व्यक्त केले. या संदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले येत्या दोन दिवसात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेत मीटिंग घेऊन चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न निश्चित करू असे पवार म्हणाले, यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत वाकचौरे, कल्पसृष्टी डेव्हलपमेंट अधिकारी गांगर्डे, राशीन अभियंता वाघमारे. माजी सभापती श्याम कानगुडे, शाहू राजे भोसले, उपसरपंच शंकर देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम कानगुडे, संग्राम पाटील, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आजिनाथ मोढळे, ग्रामपंचायत सदस्य, अशोक जंजिरे ,नाझीम काझी ,माऊली सायकर, बापू धोंडे, इमरान शेख, तलरेजा, रावसाहेब पंडित, रामकिसन साळवे, सागडे भाऊसाहेब, सुभाष रेणुकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.