माहीजळगाव – येथे कै.कुसुमताई दिवटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निम्मित आयोजित कीर्तन सेवेत बोलताना यूवकविर माऊली महाराज पठाडे

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत ता.१४: आई सारखे दुसरे दैवत नाही.आई वडिलांची सेवा करा ती परमेश्वर चरणी रुजू होते.देवाने कोट्यवधी चे शरीर दिले त्याची योग्य निगा राखणे हे आपले कर्तव्य असून निर्व्यसनी रहा असे प्रतिपादन युवकविर् ह भ प माऊली महाराज पठाडे यांनी केले.
ते तालुक्यातील माही जळगाव येथे (कै.) कुसुमताई दिवटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निम्मित आयोजित कीर्तन सेवेत बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी जिल्हा परिषद सदस्या राणी ताई लंके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एड.कैलास शेवाळे,माजी नगराध्यक्ष शिवसेना नेते राजेंद्र झावरे, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले,प्रथम नगराध्यक्ष नामदेव राउत,बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर,माजी सभापती मीनाक्षी साळुंके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष माधुरी लोंढे,भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, प्राचार्य डॉ.संजय नगरकर, डॉक्टर्स संघटनेचे
तालुकाध्यक्ष डॉ.राजेश तोरडमल,आष्टी चे सभापती बद्रीनाथ जगताप,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,सावता परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी,नगरसेवक अमित चिंतामणी,मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर बोरुडे,सद्गुरु उद्योग समूहाचे शंकरराव नेवसे,निवेदक गजेंद्र यादव व गौतम काळे ,कुस्ती मल्ल विद्या संघाचे तालुका उपाध्यक्ष सावन शेटे यांच्यासह मान्यवरानी श्रद्धांजली वाहिली.यावेळी कर्जत सह जामखेड , श्रीगोद्यातील पत्रकार व निवेदक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते म्हणाले जगात सर्वांना उपमा आहेत मात्र आई ही आईच.तिची ममता,करुणा,संस्कार यासह विविध गुणांची बरोबरी कुणीच करू शकत नाही.ते घरातील जीवन लढा देणाऱ्या संस्काराचे विद्यापीठ आहे.जगात अनेक गर्भ श्रीमंत माणसे आहेत मात्र आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या इतका दळभद्री आणि कमनशिबी गरीब कुणी नाही.वृध्दाश्रम हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे.सूत्रसंचलन दादासाहेब शिंदे व प्रवीण खेडकर यांनी केले तर आभार नीलेश दिवटे यानी मानले.