सतीश कदम यांची संचालकपदी बिनविरोध निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्हा बाजार समिती सेवक वर्गाची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक करिता व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत कर्जत बाजार समितीचे सचिव सतीश कदम यांची सर्वसाधारण मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. शेख यांनी केली. सदर निवडीसाठी बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीपराव डेबरे, संजय काळे, अभय भिसे, विकास तनपुरे यांनी सहकार्य केले. सदरच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र संस्थेच्या हिताचा विचार करून कदम यांनी त्यांच्या सहकार्यानी समन्वय साधत कदम यांना संधी दिली. बिनविरोध निवडीनंतर सतीश कदम यांनी आभार मानत सर्व सदस्यांनी टाकलेला विश्वास त्यास निश्चित न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील अशी ग्वाही दिली. कर्जत बाजार समितीचे सचिव म्हणून सतीश कदम हे २०१३ पासून कार्यरत आहेत.