विकास हीच आमची काम करण्याची स्टाईल आहे, : आमदार रोहित पवार
कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार.

कर्जत (प्रतिनिधी) :- यापूर्वी शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेऊन, वैयक्तिक स्वार्थासाठी बंद दाराआड संचालक वाटून घेतले जात होते. निवडणुका कधी आल्या व कधी गेल्या हे सुद्धा कळू न देता बाजार समिती विकून खाण्याचा घाट यापूर्वी घातला गेला. परंतु आता सहकार व शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या विचारांच्या लोकांना संधी देऊन “विकास” या एका मुद्यावरच निवडणूक लढविणार आहे. विकास हीच आमची काम करण्याची स्टाईल आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
मिरजगाव येथे आयोजित बाजार समिती निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कैलास शेवाळे, बाळासाहेब साळुंखे, नामदेव राऊत, परमवीर पांडुळे, राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, किरण पाटील, बापू कासवा नितीन धांडे, संजय पवार, प्रकाश चेडे, संदीप गांगर्डे, सतोश थेटे, रघुआबा काळदाते, महेश काळे आदी उपस्थित होते पवार म्हणाले, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची सद्यस्थिती पहिली तर अत्यंत दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांचा माल साठविण्यासाठी देखील पुरेशी सोय उपलब्ध नाही. इमारतींची झालेली दुरावस्था,
मिरजगाव येथील बंद पडलेला बैल बाजार, वेतानाभावी कर्मचाऱ्यांची होणारी वाताहत, कमी होत चाललेली उलाढाल, शेतकन्यांसाठी सोईसुविधांचा अभाव अशा अनेक समस्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत. शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू