ईद-उल-फित्र रमजान ईद ची नमाज राशिन मध्ये मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथे मुस्लिम समाजाच्या वतीने रमजान ईद मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करण्यात आली. ईद दिवशी सकाळी ८ वा. सर्व मुस्लिम बांधव ठरलेल्या नियमाप्रमाणे जामा मस्जिद मरकज येथे एकत्र होत ईद ची नमाज पडण्यासाठी ईदगाह मैदानाकडे रवाना झाले. ८.३० वाजता ठरलेल्या वेळेवर मौलाना शहानवाज कुरेशी यांनी नमाज पठण केले, त्यानंतर सर्वांच्या खुशालीसाठी भाईचारा , सामाजिक एकाेपा साठी अल्लाह कडे दुवा मागण्यात आली. त्यानंतर ईदचा खुदबा पठण करीत. एकमेकांची गळाभेट करीत मोठ्या उत्साहाने रमजान ईदची नमाज पडण्यात आली. यानंतर मुस्लिम बांधवातील प्रत्येक जण आपापल्या घराच्या दिशेने जात असताना हिंदू बांधवांची गळा भेट करीत ईदच्या शुभेच्छा देत शीरखुर्मा पिण्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर संपूर्ण दिवसभरात मुस्लिम बांधवांच्या घरी जात शीरखुर्माचा आस्वाद घेत हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या
मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात अल्लाह च्या मर्जीनुसार घातलेल्या नियमाचे पालन करीत या महिन्यात रोजा, तराबी नमाज, कुरआन, चे पठण करीत अल्लाह कडे खुशाहालीची मागणी प्रत्येक मुस्लिम धर्मातील नागरिक करीत असतात याप्रकारे रमजान ईद चा आनंद उत्सव मुस्लिम समाजाने साजरा केला.