राशीन व परिसरात शॉप रबर स्पीड ब्रेकर बसविणे अत्यंत गरजेचे:-पै.शाम कानगुडे.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- बारामती- अमरापुर राज्यमार्गावर मा. सभापती पै. शाम कानगुडे यांच्या केलेल्या विनंतीला मान देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी उपविभागीय अधिकारी प्रशांत वाघचौरे व राशीन येथील वाघमारे यांनी पाठपुरावा करीत खेड पासून ते बेनवडी पर्यंत डांबरी स्पीड ब्रेकर बनविले आहेत परंतु राशीन भागात जंजिरे पेट्रोल पंप, परीट वाडीला जोडलेला भिगवन चौक, युनियन बँक, मातंग वस्ती, चौफुला असलेला महात्मा फुले चौक, जगदंबा विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, एसटी स्टँड, नागेशा मंदिर, इतर महत्त्वाच्या वाहतुकीची कोंडी असलेल्या क्रॉसिंग धोकेदायक वळणावर व रस्त्यावर शॉप रबर स्पीड ब्रेकर बसवणे अत्यंत गरजेचे आहे या अनुषंगाने श्याम कानगुडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून अधिकाऱ्यांकडून रबरी ब्रेकर बसविण्याचे आश्वासन दिले असून अद्याप शॉप रबर स्पीड ब्रेकर बसवलेले नसून लवकरात लवकर बसावेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते . संबंधित विभागाने दलद गतीने पाऊले उचलीत ब्रेकर बसवावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा कडवट इशारा शाम कानगुडे यांनी दिला आहे.