Advertisement
ब्रेकिंग

कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरणाचे जाळे होणार मजबूत; आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

तीन नवीन उपकेंद्र मंजूर, पाच उपकेद्रांचे विस्तारीकरण, ३३४ कि.मी.ची केबल लाईन तर ६५ कि.मी.ची लिंक लाईन मंजूर

Samrudhakarjat
4 0 1 9 5 1

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे. मतदारसंघात तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून पाच उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. शिवाय कर्जत विभाग मध्ये ३३४ कि.मी. ची केबल लाईन आणि ६५ कि.मी.ची लिंक लाईनही मंजूर झाली आहे.

वीज, रस्ते ही विकासाची मानके समजली जातात, किंबहुना यावरूनच विकास मोजला जातो. त्यामुळे वीज आणि रस्त्यांसह इतरही पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे आमदार रोहित पवार यांनी जातीने लक्ष दिले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आणि मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांत वीज यंत्रणेचे मजबुतीकरण केले. आता पुन्हा नव्याने महावितरणच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत मतदारसंघात चौंडी, चिलवडी आणि जळगाव या तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी आणली असून कुळधरण, मिरजगाव, भांबोरा, खांडवी आणि भानगाव या उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी नायगाव, घुमरी आणि दिघोळ हे उपकेंद्र आमदार रोहित पवार यांनी मंजूर करुन आणले असून त्यापैकी नायगाव आणि घुमरी या उपकेंद्रांचे लोकार्पण झाले आहे तर दिघोळ उपकेंद्राचे काम हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर कर्जत येथील वीज उपकेंद्रांच्या विस्तारीकरणाचेही काम करण्यात आले आहे.

याशिवाय गळती व वीज हानी रोखण्यासाठी कर्जत विभागात ३३४ कि.मी.ची एबी केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये खर्डा, आनंदवाडी, राजुरी, सारोळा, जामखेड, तरडगाव, कर्जत, चापडगाव, मिरजगाव, बेलगाव, जुनी कोंभळी, जुने मलठण, नवी कोंभळी, नवीन मलठण, कुळधरण, शिंदा, पिंपळवाडी, कोपर्डी, नांदगाव, येसवडी, खांडवी, दूरगाव, भोसे, धालवडी, थेरगाव, चांदा, मुळेवाडी, थेरवडी, हनुमाननगर, जामदरवाडा, राक्षसवाडी, नाथाचीवाडी, टाकळी खु, चांदगाव, राजुरी, पाडळी, अरणगाव, निमगाव गांगर्डा, मांदळी, बेलवंडी या गावांचा समावेश आहे. तसेच कर्जत विभागात ६५ कि.मी.ची लिंक लाईनही मंजूर झाली असून त्याचा फायदा कोंभळी, चांदे, जामखेड, अरणगाव, खांडवी, कर्जत, नांदगाव आणि राशीन-येसवडी या गावांना होणार आहे.

या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरु करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी सांगितली. 

कृषी आकस्मितता निधीतून (एसीएफ) घुमरी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून दिघोळ उपकेद्रांचेही काम लवकरच सुरु होणार आहे आणि राशीन उपकेंद्राच्या विस्तारीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अखंडीत आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज पुरवठ्याबाबत पहिल्यापासून सर्वांच्याच मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाचा याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मतदारसंघातील हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याच्यादृष्टीने पहिल्यापासून प्रयत्न करुन राज्य शासनाकडून त्यासाठी पुरेसा निधी मंजूर करुन आणला. त्यामुळे मतदारसंघातील वीजपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली, याचं लोकप्रतिनिधी म्हणून समाधान आहे. – रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker