कर्जत तालुका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचे खेड मध्ये भव्य स्वागत व सत्कार

राशीन( प्रतिनिधी ):- जावेद काझी .भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा ची नवनिर्वाचित कर्जत तालुका कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली असून, नूतन पदाधिकाऱ्यांचा तालुक्यातील विविध गावात भव्य दिव्य स्वागत व सत्कार समारंभ होत असून सोमवार दिनांक ४/३/२०२४ रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड येथे तालुक्यातील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा नूतन पदाधिकारी कर्जत तालुका अध्यक्ष फारुक भाई पठाण, तालुका उपाध्यक्ष जमीर भाई शेख, ता. उपाध्यक्ष पप्पूभाई सय्यद , राशीन शहराध्यक्ष जमीर भाई काझी, कर्जत शहराध्यक्ष जावेद भाई काझी,
सोशल मीडिया अध्यक्ष सद्दाम शेख, कार्यकारणी सदस्य रियाज शेख, या सर्वांचे खेड येथील उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते फेटा, बांधून पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड गावचे लोकनियुक्त सरपंच अमित मोरे पाटील हे होते. प्रस्ताविक करताना भाजपा जिल्हा युवा उपाध्यक्ष धनंजय मोरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच खास करून खेड गावचे सुपुत्र जमीर शेख उर्फ (बादशाह) या योग्य अशा मनमिळावू व्यक्तीची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल तसेच साहिल काझी यांनी केलेल्या प्रयत्नातून प्रथमच कर्जत तालुक्यात संपूर्ण अल्पसंख्यांक कार्यकारणी जाहीर झाल्याबद्दल भाजपा प्रदेश अल्पसंख्यांक युवा मोर्चा उपाध्यक्ष साहिल दादा काझी यांचे व इतर पदाधिकाऱ्यांचे खेड ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी नूतन तालुका अध्यक्ष फारुक भाई पठाण यांनी पक्षाचे ध्येयधोरणा विषयी माहिती देऊन सर्व अल्पसंख्यांक बांधवांनी भारतीय जनता पार्टी मध्ये सामील होण्याचे आवाहन केले. तसेच भाजपा ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी व साहिल काझी यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत विशेष आभार मानले. यावेळी लोकभिमुख सरपंच अमित मोरे पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे पाटील, अनिल काकडे अध्यक्ष खेड, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष चुत्तर, संघ कार्यकर्ते मंगेश मोरे पाटील, खेडचे उपसरपंच सुनील गायकवाड, माजी सरपंच सोमनाथ वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य आमीन भाई शेख, ग्रामपंचायत सदस्य मोहन शेटे, मेहबूब भाई शेख, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.