शेतकऱ्याला फाटक्या नोटा आहेत असे म्हणत अकरा हजार रुपये घेऊन चोर फरार

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव मधील बँक ऑफ बडोदा येथे भरत राऊत या शेतकऱ्याल फाटक्या नोटा आहेत असे म्हणत अकरा हजार रुपयाला दोन चोरट्यांनी फसवण्याची घटना घडली आहे.
शेतकरी भरत राऊत हे बँक ऑफ बडोदा या बँकेच्या आंबीजळगाव येथील शाखेमध्ये आले होते. यावेळी त्यांनी 46 हजार रुपये बँकेमधून काढले असता त्यांच्या शेजारी उभे असलेल्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला दिलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये काही नोटा फाटक्या आहेत असे सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने त्या नोटा मी शोधून देतो असे म्हणून त्या नोटा हातामध्ये घेतल्या त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक जोडीदार त्या ठिकाणी होता या दोघांनी संगणमत करून 11000 रुपयांची रक्कम पळून नेली. हा प्रकार भरत राऊत यांच्या लक्षात आला यानंतर त्यांनी शाखाधिकारी यांना ही माहिती दिली.
बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दोन्ही चोर दिसत आहेत. पोलीस विभाग त्या चोरांचा शोध घेत आहे.