Advertisement
ब्रेकिंग

डी .एस .कांबळे यांनी आदर्श पिढी निर्माण केली – आ. राम शिंदे.

Samrudhakarjat
4 0 1 9 3 7

राशीन (प्रतिनिधी) : – शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेमध्ये सेवानिवृत्त केंद्रप्रमुख डी . एस .कांबळे यांनी अनेक गुणवंत व आदर्श विद्यार्थी घडविले . त्यांनी केलेल्या कार्यामुळेच ते शतायुषी होतील . त्यांनी शैक्षणिक , सामाजिक , धार्मिक क्षेत्रात चांगली काम केले आहे . मुलांवरती चांगले संस्कार केले . आदर्श पिढी निर्माण करण्याचे काम केले . असे प्रतिपादन आ. प्रा . राम शिंदे यांनी केले . ते राशीन येथे डी एस कांबळे यांच्या अमृत महोत्सवी सोयाप्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवक नेते राजेंद्र देशमुख हे होते . कार्यक्रमास दैनिक पुढारी चे बिरो चिप संदीप रोडे , राशीनच्या सरपंच नीलम साळवे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र पांडुळे , माजी उपसरपंच शाहू राजेभोसले , माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम कानगुडे , भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे ,शहराध्यक्ष बापू धोंडे , शहाजी राजेभोसले , दत्ता गोसावी , सोमनाथ कोल्हटकर , व्यापारी असोसिएशन चे योगेश शर्मा , अविनाश दोशी ,औदुंबर देवगावकर , सुधीर संचेती , ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल मोढळे , श्रीकांत साळवे , दीपक थोरात , प्रसाद मैड , डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पंकज जाधव , पेन्शनर असोसिएशनचे डॉ. देविदास साळवे , यांच्या सामाजिक शैक्षणिक , वैद्यकीय , महावितरण , कृषी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . यावेळीदैनिक पुढारीचे ब्युरो चीफ संदीप रोडे , युवक नेते राजेंद्र देशमुख , नीलम साळवे , शरद शेटे , मालोजीराजे भिताडे , पत्रकार सोमनाथ गोडसे यांची भाषणे झाली . यावेळी डी एस कांबळे यांचा आ.राम शिंदे , राजेंद्र देशमुख , रावसाहेब देशमुख पतसंस्था , विविध सामाजिक संघटना, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दादा शिंदे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्जत तालुका प्रेस क्लब , व्हेरी नाईस ग्रुप , महावितरण कर्मचारी यांचे विशेष सहकारी लाभले .आभार नितीन कांबळे यांनी मानले. * सेवानिवृत्ती केंद्रप्रमुख डी एस कांबळे यांचा अमृत महोत्सव सोहळ्या प्रसंगी सत्कार करताना आ. राम शिंदे व इतर मान्यवर छाया किशोर कांबळे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker