महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते अनंत राऊत प्रथमच कर्जत शहरात

कर्जत (प्रतिनिधी) :- श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान कर्जत आणि राष्ट्रवादी चित्रपट, कला,साहित्य, सांस्कृतिक विभाग कर्जत तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन कर्जत मधील शिक्षक कॉलनी येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते अनंत राऊत (अकोला) यांचा काव्यात्मक प्रबोधन हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, भोंगा वाजलाय, माय बाप अशांसारख्या कवितांनी अवघ्या महाराष्ट्राच्या केवळ तरुणाईलाच नव्हे तर अबाल वृद्धांनाही वेड लावणाऱ्या कवी अनंत राऊत यांना पहिल्यांदाच प्रत्यक्षात ऐकण्याची संधी कर्जतकरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे.
आमदार रोहीत दादा पवार या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. शहरातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता कर्जत मधिल शिक्षक कॉलनी येथे श्री विठ्ठल मंदिर प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या काव्यात्मक प्रबोधन कार्यक्रमाचा सर्व कर्जतकरांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे