कर्जत तालुक्यातील लेकीची झाली जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील चापडगावला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे चापडगाव मधील अधिकाऱ्यांचं कुटुंब म्हणून कोकाटे कुटुंबाकडे पाहिलं जातं. याच कोकाटे परिवारातील कुमारी श्रुती सुभाष कोकाटे ही चापडगाव मधील पहिली महिला आयएएस अधिकारी म्हणून नुकतीच यशस्वी ठरली.
एकाच दिवशी वडील श्री. सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची पोलीस उपायुक्त पदी पदोन्नती तर मुलगी श्रुती सुभाष कोकाटे हिची केंद्रीय लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली.
यानिमित्ताने कर्जतमध्ये या प्रशासकीय अधिकारी बापलेकीचा सहकुटंब सन्मान सत्कार करण्याचा योग कर्जत शहरातील चापडगावच्या लेकी-सुनांच्या वतीने आणि राष्ट्रवादी चित्रपट,कला, साहित्य, सांस्कृतिक विभागाच्या तालुका अध्यक्ष स्वाती पाटील व सांस्कृतिक विभागाचे सदस्य यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवेदक श्री.मनमोहनदास खुडे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, रिटायर्ड आर्मी ऑफिसर लक्ष्मण कोकाटे, श्री. राऊत साहेब, सौ.कावेरी राऊत, श्री.आनंद कोकाटे, श्री कोकाटे सर, सौ.संगीता कोकाटे, अजिंक्य पाटील,राहुल थोरात, श्रुतीच्या आई सौ. शुभांगीकाकू, भाऊसाहेब संग्राम आणि कोकाटे परिवारातील सदस्य उपस्थित होते.